Banner 1
Banner 2
Banner 3
Banner 4
Banner5

Our Goal is to Help People

कै कृष्णामामा महाजन हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक धगधगते व्यक्तिमत्त्व होते. आपल्या सामाजिक कार्यातून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.कै कृष्णामामांच्या निधनानंतर त्यांचे विद्यार्थी आणि हितचिंतक यांनी 2001 साली कै कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान ची स्थापना केली. कै मामांच्या स्मृति जागृत ठेवून त्यांच्या समाजकार्यचा वारसा जपावा हाच प्रतिष्ठानचा उद्देश आहे .

 

कै कृष्णामामा महाजन स्मृति पुरस्कार
अप्रकाशित राहून सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो .आजवर अनेक मान्यवरांची या समारंभाचे प्रमुख उपस्थिती लाभली आहे .रत्नागिरी जिल्ह्यात या पुरस्काराने मानाचे स्थान निर्माण केले आहे .


Read More

सेवा है यज्ञकुंड,
समिधा सम हम जले !


Join the Helpers Group

कै. कृष्णामामांचे विचारधन

माणसाची श्रेष्ठता व योग्यता जन्माधिष्टीत नसून कर्माधिष्टीत असते

आपले ध्येय निश्चित करून त्या मार्गाने सतत चालत राहावे, जर कोन बदलला तरी काही काळाने आपण परत पूर्वपदावर कसे येतो हे समाजात नाही. म्हणून आपली दिशा चुकणार नाही यासाठी सतत जागृत राहावे लागेल.

दैवाला दोष देऊ नका, स्वतःचे 80% काम आधी पूर्ण करा, 20% देव देईलच!

सदाचाराशिवाय शौर्य म्हणजे हिंसक गुन्ह्यांना आमंत्रण.

इतरांना चांगले वागण्यास प्रवृत्त करणे यासारखा चांगुलपणा नाही.

सात्विक दान हेच खरे दान.