कै कृष्णामामा महाजन हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक धगधगते व्यक्तिमत्त्व होते. आपल्या सामाजिक कार्यातून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. कै कृष्णामामांच्या निधनानंतर त्यांचे विद्यार्थी आणि हितचिंतक यांनी 2001 साली कै कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान ची स्थापना केली. कै मामांच्या स्मृति जागृत ठेवून त्यांच्या समाजकार्यचा वारसा जपावा हाच प्रतिष्ठानचा उद्देश आहे.

कै कृष्णामामा महाजन स्मृति पुरस्कार अप्रकाशित राहून सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. आजवर अनेक मान्यवरांची या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या पुरस्काराने मानाचे स्थान निर्माण केले आहे.

प्रतिष्ठान या व्यतिरिक्त अनेक सामाजिक उपक्रम राबवत आले आहे. कोळथरे येथील आश्रमातील विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य, शिवणकाम प्रशिक्षण, साहाय्यक परिचारिका प्रशिक्षण असे उपक्रम, कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविले जातात.

आकस्मिक येणाऱ्या संकटाला सामोरे जाताना समाजाला सहाय्य करण्यासाठी प्रतिष्ठान सदैव तत्पर असते. कोव्हीड काळात गरजूंना अन्यधान्याचे संच आणिआर्सेनिक अलबम चे वाटप करण्यात आले. निगर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना पत्रे कौले, नारळ, सुपारी यांची रोपे तर आंबा काजू कलमे यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. चिपळूण पूरग्रस्तांसाठी सहाय्य केंद्र चालू करून अत्यावश्यक सेवा करण्यात आली. दापोली तालुक्याच्या ऑनलाइन रक्तगट सुचिचे काम नुकतेच हाती घेण्यात आले आहे .

भविष्यात ही असेच सामाजिक कार्य चालू ठवण्याचा निर्धार प्रतिष्ठान ने केला आहे.

Our Trustees

बिपीन रामचंद्र पाटणे
अध्यक्ष
गंगाराम शंकर ईदाते
कार्यवाह
दीपक श्रीकृष्ण महाजन
कोशाध्यक्ष

कार्यकारी मंडळ


सहकार्यवाह- डॉ.प्रसाद अवधूत करमरकर

उपाध्यक्ष- संजय रामचंद्र करंदीकर

उपाध्यक्ष- मिहीर दीपक महाजन

कार्यसमिती सदस्य- मिलिंद एकनाथ जोशी

कार्यसमिती सदस्य- दिलीप सुधाकर पाटील