GANPATI DECORATION CONTEST 2022

कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठान युवा प्रेरणा कट्टा आयोजित

Eco Friendly बाप्पा सजावट स्पर्धा (ऑनलाईन) 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2022
GANPATI-DECORATION-CONTEST-2022

प्रथम क्रमांक

Sanjay Jagannath Vartak, Kuwarbav, Ratnagiri

विषय : एकजुटीने भ्रष्टचाराची हंडी फोडणारा बाप्पा. साहित्य : पर्यावरण पूरक वस्तू , पुठ्ठा, कागद, दोरा, पिठाची चिक्की, कापड, वडाच्या पारंब्या, टाकाऊ वस्तू , इ. माहिती : प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही आम्ही वर्तक कुटुंबीयांनी इकोफ्रेंडली १२ फुटी देखाव्यामध्ये बाप्पा साकारला आहे. आमच्या या कलाकृतीतून देशात चाललेला वाढता भ्रष्टाचार, घोटाळे व धर्मावरून चालेले राजकारण या सर्वांवर भक्ती मार्गातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भ्रष्टाचार व धर्माचे राजकारण यामधून होणारी गोरगरीब जनतेची पिळवणूक व महागाई ही कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून आमचा बाप्पा सर्व धर्मीय लोकांना घेऊन भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहे. भ्रष्टाचार व घोटाळे या सर्वांमुळे सामान्य जनतेचे होणारे हाल, देशाच्या प्रगतीवर होणारा परिणाम, देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम हे सर्व कुठेतरी थांबू दे असा आमचा उंदीर मामा बाप्पाच्या चरणी प्रार्थना करत आहे. "हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में सब भाई भाई..." असे म्हणून सर्व धर्मीय एकत्र येऊनच या सर्वाला आळा घालू....




द्वितीय क्रमांक

Shital vitthal koli, Sangli

आत्ताच्या जीवनामध्ये हरवत चाललेला माणुसकी ही पूर्वी चाळ....चाळीमध्ये बघण्यास मिळायची प्रत्येक सण एकत्रित आनंदाने उत्साहाने प्रेमाने आपलेपणाने साजरा व्हायचा त्या जुन्या गोष्टी परत दाखवण्याचा प्रयत्न




तृतीय क्रमांक

विभागून

कल्पेश विकास रेळेकर, दापोली

गणेश मूर्ती हि शाडू मातीची असून १९५५ पासून आणत आहोत. गणेश मूर्ती भोवती सजावट हि पुठ्याची करण्यात आली आहे. (इको फ्रेंडली) माझी वसुंधरा यावर देखावा करण्यात आला आहे. अस्वच्छ झोपडी केले त्यामध्ये अस्वछता दाखवण्यात आली आहे. स्वच्छ झोपडी केले त्यामध्ये स्वच्छता दाखवण्यात आली आहे. jcb उत्खनन करतेवेळी दाखवण्यात आले आहे. वृक्ष तोड दाखवण्यात आली आहे त्याचे दुष्परिणाम पाऊस कमी पडतो. दुष्काळ ग्रस्त शेतकरी पाऊसाची वाट पाहतो. पाऊस कमी पडत असल्याने झाडे व गवत उगवत नाही त्यामुळे जनावरे कुपोषित दाखवण्यात आली आहेत. बंधारा दाखवण्यात आला आहे. पाणी आडवा पाणी जिरवा.




,




उत्तेजनार्थ

Anil Laxman Gotad, Kotawade Gavanwadi Ratnagiri

मुर्ती मी स्वत: शाडू मातीची संपूर्ण मुर्ती हाती काढली आहे. ह्या वर्षी मी द्वारकामाई दिपोत्सव हे सीन केले आहे. ह्या सजावटीसाठी गवत,जास्त कागदाचा वापर केला आहे. तसेच गहुच्या पीठाची गम करून वापरली आहे.